तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी) : कोरोना रुग्ण आढळला अशा प्रकारच्या अफवा समाजमाध्यमांत अफवा पसरत आहे. या अफवा पसरल्यानंतर शासकीय यंत्रणेवर ताण येऊन कामात अडथळा निर्माण होत आहे. अश्या प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाई करणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी सांगितले आहे.
शिरूर तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत ९ झाली आहे. त्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर बाकीचे रुग्ण ठणठणीत असल्याचे प्राथमिक आरोग्य अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी सांगितले. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्येक बातमीची शहानिशा करावी. अशा प्रकारच्या पसरणाऱ्या अफवांमुळे जनसामन्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. तसेच भीतीचे वातावरण निर्माण होऊन शासकीय यंत्रणेवर ताण येतो. आम्ही करत असलेल्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊन आम्हाला सर्व बाबींना तोंड द्यावे लागत आहे.
गावांमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींची चौकशी करूनच गावात घ्यावे, नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गावांमध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आहे अश्या प्रकारच्या अफवा विविध गावातील ग्रुपवर मेसेज फिरत आहे, अशा अफवा पसरत आहे.या प्रकारच्या विनाकारण अफवा पसरवणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करणार असल्याचे शिक्रापूर पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र माळी यांनी सांगितले आहे.