Share Market Today: अस्थिर व्यापाराच्या दरम्यान आज 29 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाले. आज सेन्सेक्स 195 अंकांनी वाढला. तर निफ्टी 21,982 वर बंद झाला. तसेच लहान आणि मध्यम समभागांमध्ये जोरदार खरेदी झाली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 2.94 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.84% वाढीसह तर स्मॉलकॅप निर्देशांक 0.50% वाढीसह बंद झाला. आजच्या व्यवहारात सर्वात जास्त तेजी वीज, उद्योग, कमोडिटी, धातू आणि बँकिंग समभागांमध्ये दिसून आली. दुसरीकडे बीएसई फार्मा निर्देशांक अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरणीसह बंद झाला.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 195.41 अंकांनी किंवा 0.27% ने वाढून 72,500.30 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 31.65 अंक किंवा 0.14% च्या वाढीसह 21,982.80 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹2.94 लाख कोटी –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 29 फेब्रुवारी रोजी 388.91 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवार 28 फेब्रुवारी रोजी 385.97 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.94 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.94 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 22 समभाग आज वाढीसह बंद झाले. यामध्ये इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये 1.81% वाढ झाली आहे. यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) 1.73 टक्के, एचसीएल टेक नेस्ले इंडिया 1.15 टक्के, एशियन पेंट्स 1.13 टक्के, पॉवर ग्रिड च्या शेअर्समध्ये 1.07 टक्के वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर उर्वरित 8 सेन्सेक्स समभाग घसरणीसह बंद झाले. यामध्ये टाटा मोटर्स चे समभाग 0.73 टक्क्यांनी घसरले. तर टेक महिंद्रा 0.60 टक्के, टीसीएस 0.59 टक्के, आयटीसी 0.51 टक्के आणि भारती एअरटेल 0.51 टक्क्यांनी घसरले.
1,908 समभाग घसरले
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज वाढीसह बंद होणाऱ्या समभागांची संख्या जास्त होती. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,908 शेअर्सचे व्यवहार झाले. त्यापैकी 1,908 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,880 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 120 समभाग कोणत्याही चढउताराविना समपातळीत बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 203 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 49 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.