जपान देशात २०२४ नवीन वर्ष विध्वंस घेऊन आला. या देशाला भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून सोडले. या दरम्यान साऊथ सुपर स्टार जूनियर एनटीआर तेथे उपस्थित होता, त्याने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे. आरआरआर एक्टर जूनियर एनटीआरने सांगितले की तो गेल्या काही दिवसांपासून जापान स्थायी होता. भूकंप येण्याच्या काही तासांपूर्वी तो जपान मधून मायदेशी परतला होता. त्याने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्याला या घटनेमुळे धक्का बसला आहे.
जूनियर एनटीआर ने पोस्टमध्ये लिहिले आहे की, आज जपानवरून मायदेशी परतलो आणि तेथे भूकंप झाल्याचे कळले. यामुळे मला धक्काच बसला आहे. मी मागील काही दिवस जपान मध्ये होतो. जपानमधील भूकंपग्रस्त लोकांनप्रति संवेदना व्यक्त करत, जपान लवकरात लवकर यातून बाहेर निघेल अशी मला आशा आहे.मजबूत रहा, जपान.” असं म्हणत त्याने भावूक पोस्ट लिहिली आहे.
Back home today from Japan and deeply shocked by the earthquakes hitting. Spent the entire last week there, and my heart goes out to everyone affected.
Grateful for the resilience of the people and hoping for a swift recovery. Stay strong, Japan 🇯🇵— Jr NTR (@tarak9999) January 1, 2024
जूनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास तो सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. त्याने नुकतेच अपकमिंग चित्रपट देवरा बाबत एक पोस्ट शेअर केली होती. तो लवकरच या चित्रपटाचा टिझर रिलीज करणार आहे. तो येत्या काळात जान्हवी कपूर सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच तो वॉर २ मध्येही दिसणार आहे.
दरम्यान, जपानमध्ये परिस्थिती भीषण आहे.भूकंपामुळे समुद्रात उंच लाटा उसळल्यानंतर देशाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टी भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे