मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे शेअरबाजारात खरेदी विक्रीच्या लाटा येण्याचे वातावरण चालू आहे. सकाळी निर्देशांकात ( stock market news today ) बरीच घट झाली होती. मात्र दुपारी झालेल्या खरेदीमुळे निर्देशांक पूर्वपदावर आले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा ( bombay stock market news ) निर्देशांक 9 अंकांनी म्हणजे केवळ 0.02 टक्क्यांनी वाढून 46,263 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ( national stock exchange ) निर्देशांक निफ्टी ( nse nifty ) 9 अंकांनी वाढून 13,567 अंकावर बंद झाला.
मंगळवारी बजाज फायनान्स, एचडीएफसी, टेक महिंद्रा, एचडीएफसी बॅंक, टाटा स्टील या कंपन्याचे शेअर वाढले. स्टॅंडर्ड अँड पूअर या पतमानांकन संस्थेने या वर्षी भारताचा विकास दर सुधारून उणे 7.7 टक्के राहील असे सांगितल्यामुळे निर्देशांकांचे जास्त नुकसान झाले नाही.