खाडीतील तणावाचा निर्देशांकांवर परिणाम

नीती आयोगाच्या बडग्यामुळे वाहन कंपन्यांवर परिणाम

मुंबई – अमेरिकेने इराणवरील निर्बंध कडक केल्यामुळे संभ्रमाचे वातावरण झाले आहे. परिणामी गुंतवणूकदारांकडून खरेदीपेक्षा विक्री जास्त झाल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक कमी झाले.

सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 71 अंकांनी कमी होऊन 39,122 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 अंकांनी कमी होऊन 11,699 अंकांवर बंद झाला. खाडीतील तणावामुळे अर्थातच तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरवर परिणाम झाला.

नीती आयोगाच्या इलेक्‍ट्रिक वाहन धोरणामुळे आज वाहन निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर मोठा परिणाम झाला. क्रुडचे दर जवळजवळ पाव टक्‍क्‍यांनी वाढवून 65 प्रति पिंप या पातळीवर गेले. रुपयाच्या मूल्यात मात्र आज पंधरा पैशाची सुधारणा झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.