मुंबई – करोना लसीकरणाचा कार्यक्रम विविध देशात तयार होत आहे. त्यामुळे लवकरच उद्योग- व्यवसाय आणि जागतिक व्यापार पूर्वपदावर येण्याच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात जोरदार खरेदी करीत आहेत. परिणामी निर्देशांक ( stock market news today ) उच्च पातळीवर असूनही त्यांची आगेकूच चालू आहे.
भारतीय शेअर बाजारातही बुधवारी तुफान खरेदी होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ( bombay stock market news ) सेन्सेक्स ( sensex today ) तब्बल 494 अंकांनी म्हणजे 1.09 टक्क्यानी उसळूून प्रथमच 46 हजाराच्या पुढे जाऊन 46,103 अंकावर विराजमान झाला. विस्तारित पाया असलेल्या ( national stock exchange ) राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ( nse nifty ) 136 अंकांनी वाढून 13,529 हा नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला.
एशियन पेंट्स कंपनीचा शेअर आज तीन टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर आज झालेल्या खरेदीचा फायदा कोटक बॅंक, ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी या कंपन्यांना झाला. मात्र या तेजीच्या वातावरणातही अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, मारुती, स्टेट बॅंक, बजाज ऑटो यांना नफेखोरीचा सामना करावा लागला.
रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक बिनोद मोदी यांनी सांगितले की, निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे अनेकजण सावध असतांनाच जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यामुळे स्थानिक पातळीवरही जोरदार खरेदी झाली. भारत सरकारने अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतून अधिक परतावा लवकर मिळेल या शक्यतेने परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याच्या मनस्थितीत आहेत.
त्यांचा गेल्या पंधरवड्यात भारतीय निर्देशांकांना मोठा आधार मिळाला आहे. त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेचा घसारा अपेक्षेपेक्षा कमी झाल्यामुळे वर्षाच्या अखेरीस विकासदर सकारात्मक होईल. यामुळे अर्थव्यवस्थेचा भविष्यकाळ उत्तम असल्याचे देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना वाटते. मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 2,909 कोटी रुपयांची खरेदी केली.
अशियायी, द. कोरिया, जपान, युरोप, अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्यामुळे अर्थातच तेलाची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे क्रुडचे दर 1 टक्क्यांनी वाढून 50 प्रति बॅरेलच्या जवळपास गेले अशा परिस्थितीतही रुपयाचे मूल्य स्थिर असून आज रुपयाचे मूल्य तीन पैशांनी वाढून रुपयाचा भाव 73 रुपये 57 पैसे प्रति डॉलर झाला.