मेलबर्न –ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू जस्टिन लॅंगर यांनी क्रीडापटूंना सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला चांगले आहात किंवा वाईट आहात हे कसे काय सांगू शकते, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक क्रीडापटू सक्रिय आहेत. ते चाहत्यांशी संवाद साधतात. मात्र, ज्या व्यक्ती तुम्हाला ओळखतात त्यांनी जर काही सल्ला दिला तर तो आपण विचारात घेतो. मात्र, खेळाडूंनी सक्रिय असेपर्यंत सोशल मीडियापासून लांब राहिले पाहिजे, असेही लॅंगर म्हणाले.