4 मे पासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार उड्डाणे

नवी दिल्ली : एयर इंडियाने एक आनंदाची बातमी दिली आहे. 4 मे पासून निवडक देशांतर्गत उड्डाणांसाठी आणि 1 जून पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी बुकिंग करण्यास एयर इंडियाने परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे देशभरात लावण्यात आलेला लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूपासून बचावासाठी २५ मार्च २१ दिवसाच्या लॉकडाऊनची  घोषणा केली होती. त्यानंतर कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन ३ मी पर्यंत वाढवण्यात आला होता. यामुळे देशातील तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. 

4 मे पासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार उड्डाणे : इंडिगो
देशातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो ने मंगळवारी सांगितले कि, ४ में पासून देशात टप्प्याटप्प्याने विमान सेवा बहाल करण्यात येईल. दरम्यान, प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी १४ एप्रिल देशाला संबोधित करताना लॉकडाऊन १९ दिवस वाढवण्याची घोषणा केली होती. 
दरम्यान, देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात देशात ९५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे तर, ६३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ७९२ वर पोहचली असून, २ हजार १५ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  आज गुजरातमध्ये १७६ राजस्थान ४१, आंध्र प्रदेश ३१ कर्नाटक १२ महाराष्ट ४ आणि मेघालयात २ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.