रेडा -लॉकडाऊनमुळे इंदापूर तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील 125 जणांना मंगळवारी (दि. 11) दुपारी दोन वाजता सहा एसटी बसमधून त्यांच्या गावाकडे रवाना करण्यात आले. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटकसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील अनेक नागरिक लॉकडाऊनमुळे इंदापूर तालुक्यात अडकले होते.
शासनाच्या आदेशानंतर त्यांना त्यांच्या मुळगावी परतण्यासाठी बसची सोय करुन देण्यात आली. इंदापूरमधून प्रथमच मध्यप्रदेश मधील 125 नागरिकांना त्यांच्या राज्यात पोहोच करण्यासाठी प्रशासनाकडून इंदापूर आगाराच्या सहा बस सोडण्यात आल्या.
तत्पूर्वी या मजुरांचे शारीरिक तापमान, नाडी परीक्षण, ऑक्सिजन तपासणी करण्यात आली. प्रवासासाठी वैद्यकिय दाखला देण्यात आला. प्रवासात त्यांच्या खाण्यापिण्याची सोय इंदापूर प्रशासनाने केली होती, अशी माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.