पाथर्डी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारचा विकासाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी बुथ कमिटीच्या सदस्यासह सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी नेटाने कामाला लागावे, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले. आमदार मोनिका राजळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात केंद्र सरकारच्या सलग दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
युवराज पोटे, कर्जतचे जि.प.सदस्य अशोक खेडकर, राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, उपाध्यक्ष गोकुळ दौंड, नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, अभय आव्हाड, अशोक चोरमले, धनंजय बडे, माजी उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पं.स. सदस्य सुनिल ओव्हळ, रविंद्र वायकर, सुनिल परदेशी, भाजपाचे शहराध्यक्ष अजय भंडारी, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष नागनाथ गर्जे, सुनिल पाखरे, नगरसेवक अनिल बोरुडे, बबन बुचकुल, मंगल कोकाटे, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा काशिबाई गोल्हार उपस्थित होते. यावेळी आमदार मोनिका राजळे , भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, बाळासाहेब महाडिक, गणेश भालसिंग, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांची भाषणे झाली. प्रस्ताविक जे.बी.वांढेकर यांनी तर आभार सुभाष केकाण यांनी मानले.