महापालिकेतर्फे औषध फवारणी

नगर,  (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. अग्निशमन विभागाकडे तीन वाहने असून मात्र या विभागाचे एकच वाहन सुरू आहे. बाकी वाहने ही शोभेची असल्याचे दिसत आहे. या अग्निशमन बंबाद्वारे ही फवारणी करण्यात येत आहे.

करोनाचा दिवसेंदिवस राज्यात आकडा वाढत असून जिल्ह्यात करोनो बाधित तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अतिदक्षता म्हणून जिल्हा रुग्णालय, मार्केट यार्ड तसेच सार्वजनिक परिसरात औषध फवारणी सुरू केली आहे.

औषध फवारणी करीत असताना महापालिका कर्मचाऱ्यांनी नागरिकांना करोनाच्या प्रादुर्भाव पासून वाचण्यासाठी घरीच रहा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, स्वतःचे संरक्षण स्वतः घरी राहूनच करा, मास्कचा वापर करा, अशी जनजागृती करीत शहरातील परिसरात औषध फवारणीचे काम करीत आहे. मात्र, अग्निशमन विभागाकडे एकच छोटे वाहन असून त्यात फक्त क्षमता 200 लिटर इतकीच आहे. त्यामुळे त्यांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. तसेच दुसरे वाहन नादुरुस्त असून ते केवळ शोभेची वस्तू उभ्या आहेत.

मुंबई व पुणे शहरातील सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक फवारणी करण्यात येत आहे. नगर महापालिकेनेही बुधवारी मध्यवर्ती शहरातून जंतूनाशक फवारणीचे काम हाती घेतली आहे. आरोग्य विभागाने 600 लिटर सोडीएम क्‍लोराईड विकत घेतले आहे. जुने महापालिका कार्यालय येथून सुरू झालेली ही मोहीम गाडगीळ पंटांगण, दिल्लीगेट, चितळे रोडमार्गे कापडबाजार, उपनगरातील सार्वजनिक ठिकाणी ही फवारणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.