पुणे :- सातवी राष्ट्रीय व्हीलचेअर बास्केटबॉल विजेतेपद स्पर्धा राजनांदगाव, छत्तीसगड येथे आजपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत महिला व पुरुष गटात हे रंगतदार सामने होतील. कोविडमुळे आणि निधीच्या तीव्र तुटवड्यामुळे 4 वर्षांच्या अंतरानंतर ही राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जात आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेत 8 महिला संघ आणि 10 पुरुष संघ सहभागी होणार आहेत. यापूर्वी झालेल्या झोनल सामन्यांच्या आधारे संघांची निवड करण्यात आली आहे. भारताचे प्रतिनिधित्व केलेले अनेक खेळाडू या राष्ट्रीय स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. पुणे आणि मोहाली येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमधील माजी लष्करी कर्मचारीही ह्या स्पर्धेत खेळताना दिसतील.