Sports in Pune : महाराष्ट्र कारागृह राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाने २०२३-२४ या वर्षाचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागाचे सुनिल विठ्ठल काकरवाल तर सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून नाशिक विभागाच्या अनिता कैलास वाकचौरे यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना ट्रॉफी व रोख रुपये २१ हजार पारितोषिक देण्यात आले.
महाराष्ट्र कारागृह विभाग राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा शुक्रवारी येरवडा येथील दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय पार पडला. गृहरक्षक दलाचे महासमादेशक रितेश कुमार, कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक (पुणे विभाग) स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक (मुंबई विभाग) योगेश देसाई, कारागृह उपमहानिरीक्षक (छत्रपती संभाजीनगर) यु.टी.पवार, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय प्राचार्य नितीन वायचळ, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनिल ढमाळ तसेच इतर मध्यवर्ती व जिल्हा कारागृहांचे अधीक्षक, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि खेळाडू उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धामध्ये ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. १००, २००, ८०० मीटर धावणे, रिले, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक, लांबउडी, कराटे, कुस्ती, बॅडमिंटन एकेरी, रिंगटेनिस एकेरी हे वैयक्तिक खेळ तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्साखेच या सांघिक क्रीडा प्रकारात खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवाअमिताभ गुप्ता यांच्या संकल्पेतून यावर्षी क्रिकेटचा नव्याने समावेश करण्यात आलेला