ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेसच्या कामाला वेग; 24 तासांच्या आत चढण बांधली

मुंबई  – रेल्वेच्या मुंबई विभागीय पथकाने सपाट वाघिणींमधून प्राणवायूच्या टॅंकर्सची चढउतार सोपी व्हावी म्हणून कळंबोली मालवाहतूक यार्डात अहोरात्र काम करून 24 तासांच्या आत चढण बांधली आहे.

रो-रो सेवेच्या माध्यमातून कळंबोली मालवाहतूक यार्डातून सोमवारी रात्री 8 वाजून 5 मिनिटांनी 7 रिकामे टॅंकर विशाखापट्टणम पोलाद कारखान्याच्या यार्डात जाण्यासाठी रवाना झाले आहेत. ही गाडी वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जं. मार्गे विशाखापट्टणमच्या पोलाद कारखान्याच्या पूर्व तटीय रेल्वे विभागात पोहोचेल. या ठिकाणी रिकाम्या टॅंकर्समध्ये वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप प्राणवायू भरला जाईल.
गेल्या वर्षीच्या टाळेबंदीच्या काळातदेखील रेल्वे विभागाने अत्यावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरू ठेवून पुरवठा साखळी अबाधित राखली आणि आपत्तीकाळात देखील देशसेवेचे कार्य सुरूच ठेवले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.