मुंबई – दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार चियान विक्रम याचं घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. काल (दि. १) त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून घरात बॉम्ब असल्याची माहिती दिली. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विक्रम चेन्नईच्या बसंत नगर येथे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत राहतो.
दरम्यान, ही घटना समजताच तिरुवनमियूर ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड आणि एक स्निफर कुत्र्यासह विक्रमच्या घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी विक्रमला धमकीचा फोन ज्या मोबाईल नंबर वरून आला तो ट्रेस केला. विल्लुपुरममधील एका व्यक्तीने धमकी देऊन हा फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यापूर्वी देखील अश्याच काही बड्या कलाकारांना धमकीचे फोन आले होते. यामध्ये विजय, अजित, सूर्या, विजयकांत आणि रजनीकांत यांचा समावेश आहे.