राजगुरूनगर: दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘ नेड ‘ बँकेच्या पाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजगुरूनगर सहकारी बँकेला आज भेट दिली. याभेटीत भारताच्या ग्रामीण भागातील बँकिंग आणि सहकारी बँकिंग याबाबत अभ्यास व माहिती घेतली.
पुणे जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रणी असलेल्या राजगुरूनगर सहकारी बँकेला सहकार क्षेत्रातील देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.ग्रामीण भागात चांगली सेवा देणारी बँक म्ह्णून राजगुरूनगर सहकारी बँकेकडे पाहिले जाते. ग्रामीण भागात ही बँक ग्राहकांना कशा सुविधा देते, तिची कार्यपद्धती कशी आहे, नेट बँकिंगचा प्रणाली व इतर सेवा सुविधा कशा पुरविल्याजातात याचा अभ्यास व माहिती घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमधील सर्वांत मोठ्या ‘ नेड ‘ बँकेचे कार्यक्रम अधिकारी क्रिस्टीना पीटर्स, मार्केटिंग अधिकारी लिंडा म्बाम्बो,विभागीय अधिकारी डेव्हिड स्केजमेन, प्रोग्रॅम मॅनेजर स्टीफन बकली, वितरण सेवा प व प्रोजेक्ट मॅनेजर मगदा मुल्मान या अधिकाऱ्यांचा भेट दिली.
दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठी बँक असलेल्या ‘ नेड ‘ बँकेच्या पाच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी बँकेचे मुख्य कार्यालय, महामार्ग शाखा आणि पाईट येथील शाखेला भेट दिली. सहकारी तत्त्वावरील बँकिंग, कार्यपद्धत, कर्ज वितरण पद्धत, खात्यांचे प्रकार, खात्यातून पैसे काढण्याच्या पद्धती, ग्राहकसेवा याबद्दल त्यांनी विशेषत्वाने माहिती घेतली. अजूनही खातेदार मोठ्या संख्येने प्रत्यक्ष शाखेत येऊन पैसे देवघेव करतात, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. एटीएम कार्ड, मोबाईल बँकिंग याबाबतही माहिती घेतली. आफ्रिका देशात सर्व बहुतांश व्यवहार विविध ‘अँप’ द्वारे होतात, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीयकृत, खासगी आणि व्यापारी बँका असतानाही लोक सहकारी बँकेत येतात, याविषयी त्यांना जास्त कुतूहल होते.
बामकेचेअध्यक्ष गणेश थिगळे, उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक मुकुंद आवटे, किरण आहेर, किरण मांजरे, सतीश नाईकरे पाटील, विजया शिंदे, हेमलता टाकळकर, सागर पाटोळे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे, संजय ससाणे, अमृत टाकळकर, मंजित महिंद्रकर आदी उपस्थित होते. बँकेच्यावतीने परदेशी पाहुण्यांचे भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले. मुकुंद आवटे व पंकज गाडेकर यांनी बँकेच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली.