entertainment news – ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अभिनेत्री सोफी टर्नर सध्या चर्चेत आहे. तिचा पती जो जोनास पासून तिचा घटस्फोट घेणार असल्याची घोषणा केली . या दोघांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर याची घोषणा केली होती.
घटस्फोटाच्या घोषणेनंतर, जो जोनास आपल्या मुलींसोबत अमेरिका दौऱ्यावर व्यस्त आहे, तर सोफी टर्नर ही तिच्या प्रोजेक्टसाठी शूटिंग करत आहे. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या नवीन शो जो जोनास चा को-स्टार फ्रँक डिलनला लिप किस करताना दिसत आहे. हे कपल स्पेनमध्ये शूटिंग करत आहे. hollywood news
Frank Dillane and Sophie Turner spotted filming at Joan’s set in Spain!
via splash! pic.twitter.com/EOeAmNlfay
— Frank Dillane News (@dillanedaily) September 15, 2023
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सोफी टर्नर – फ्रँक डिलन समुद्रात मस्ती करताना दिसतात. दोघेही एकमेकांवर पाणी उडवतात. दरम्यान, ते एकमेकांना किस करताना दिसत आहेत. hollywood news
सोफी टर्नर – जो जोनास यांनी या महिन्यात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघांनीही आपले 4 वर्ष जुने वैवाहिक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांना दोन मुली आहेत, त्या सध्या जो जोनास सोबत आहेत. सोफी टर्नर – जो जोनास यांचे २०१९ साली लग्न झाले. सोफीने HBO च्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ वर आठ सीझनसाठी सांसा स्टार्कची भूमिका साकारली. तिने 2016 च्या ‘X-Men: Apocalypse’ ,2019 च्या ‘Dark Phoenix’ मध्ये जीन ग्रेची भूमिका साकारली जो जोनास बद्दल सांगायचे तर, त्याने 2005 मध्ये निक जोनास आणि केविन जोनास या भावांसोबत एक बँड सुरू केला नंतर डिस्ने चॅनल मालिका सुरू केली. त्यांनी त्यांचा सहावा स्टुडिओ अल्बम मे मध्ये रिलीझ केला सध्या ते यूएस दौऱ्यावर आहेत. Sophie Turner Frank Dillane Lip Kiss Video Viral