गेल्या अनेक दिवसांपासून देशासह संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे प्रभावित होत आहे. भारतात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. करोनामुळे फिल्म इंडस्ट्री आधीच बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका रोजंदारीवरील मजुरांना बसत होत आहे. दरम्यान, करोनाच्या समस्येसाठी आतापर्यंत त्यांनी किती डोनेशन/देणगी दिली, असे बॉलिवूड स्टार्सना विचारण्यात येत आहे.
एका ट्विटर युजरने असाच सवाल सोनम कपूरला विचारत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. युजरने सोनमला टॅग करत ट्विट केले की, सोनम, आपण सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करण्यात नेहमीच पुढाकार घेत असता. आता जेव्हा देशाला तुमची गरज आहे, तर तुम्ही देशाला वाचवणार की नाही? तुम्ही फक्त ढोंगी आहात.
ट्रोल करणा-याला सोनमनेही सडेतोड उत्तर देत सांगितले की, मी आणि माझे कुटुंबीय हे आम्ही दिलेल्या डोनेशनचा कधीही प्रचार करणार नाही. जोपर्यंत संबंधीत संस्था आम्हास अनुमती देत नाही.
दरम्यान, अलीकडच्या काळात दक्षिणेकडील बऱ्याच सुपरस्टार्सने करोना पिडितांना मदत जाहीर केली आहे. या स्टार्समध्ये प्रभास, पवन कल्याण, महेश बाबू, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआर यासारख्या मोठ्या स्टार्सचा समावेश आहे.