kutimb

महाराणी ताराबाईंच्या भूमिकेत आहे “ही’ मराठमोळी अभिनेत्री

पुणे – छत्रपती महाराणी ताराबाई भोसले या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राहूल जाधव यांनी म्हटले आहे की, सुपर वुमन महाराणी ताराबाई यांच्या जीवन चरित्राचा मराठीजनांना परिचय व्हावा आणि ऐतिहासिक नसलेल्या गोष्टी मनातून काढून टाकाव्या यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला सिनेरसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. विख्यात लेखक इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या “मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथावर आधारित या सिनेमाचे कथानक आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असलेल्या ताराराणींचे जीवन या सिनेमात अचूकपणे मांडण्यात आले आहे. राजश्री प्रॉडक्‍शन्स ही संस्था या सिनेमाची निर्मितीसंस्था असून स्पेशल इफेक्‍ट्‌स आणि व्हिज्युअल इफेक्‍ट्‌स अप्रतिमरित्या देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.