मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ने आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे.
सोनालीने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. मात्र, सोनालीला खरी ओळख मिळाली ती दिग्दर्शक रवी जाधव यांच्या ‘नटरंग’ या चित्रपटातून.
View this post on Instagram
या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यातून तिचे मनमोहक सौंदर्य आणि नृत्याविष्कार पाहून अवघ्या महाराष्ट्राला तिने वेडं लावले. सोनालीचे नुकतेच ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.
View this post on Instagram
सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.
View this post on Instagram
नुकतंच सोनाली कुलकरर्णीनं एक ब्लू रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.