आलिया भट्टची नवी सुरुवात; पहिले पुस्तक केले लॉन्च

Alia Bhatt New Book| अभिनेत्री आलिया भट्टने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. मात्र आता आलिया तिच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकतेच आलिया मुंबईतील एका बुक लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. ज्यात तिने केलेला लुक चांगलाच चर्चेत आला आहे.
या कार्यक्रमात आलिया भट्ट तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत पोहोचली होती. आलिया पिवळ्या रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये पाहायला मिळाली. तिच्या सिंपल लुकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. Alia Bhatt New Book|
दरम्यान, आलियाने आता नवीन सुरुवात केली आहे. आलियाने मुलांसाठी त्यांचे पहिले ‘पिक्चर बुक’ लाँच केले आहे, ज्याची एक झलक तिने तिच्याइन्स्टावर दाखवली आहे. आलियाने मुलांच्या कपड्यांचा ब्रँड एड-ए-मम्मा अंतर्गत मुलांचे चित्र पुस्तक मालिकेचे पहिले पुस्तक ‘एड फाइंड्स ए होम’ सादर केले आहे, ज्याचे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहे.
View this post on Instagram
पहिल्या फोटोमध्ये आलिया तिच्या पुस्तकासोबत पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या चित्रात तिने हातात पुस्तक धरलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करत आलिया भट्टने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘एक नवीन सुरुवात होत आहे. ‘एड फाइंड्स अ होम’ ही एड-ए-मम्माच्या जगाच्या पुस्तकांच्या नवीन मालिकेची सुरुवात आहे. माझे बालपण कथा आणि कथाकथनांनी भरलेले होते आणि मी देखील स्वप्न पाहिले होते की एक दिवस मी माझ्या आतल्या मुलाला बाहेर काढेन आणि पुस्तकात मांडेन, मी माझ्या सहकारी कथाकारांची आभारी आहे. ज्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कल्पनाशक्तीने आमचे पहिले पुस्तक जिवंत करण्यात मदत केली.”
आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘जिगरा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जिगरा’ बॉक्स ऑफिसवर 11 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाशिवाय आलियाकडे ‘तख्त’, ‘बैजू बावरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र 2’ असे अनेक मोठे चित्रपट देखील आहेत. Alia Bhatt New Book|
हेही वाचा:
फादर्स डेच्या निमित्ताने वरुण धवनने आपल्या लेकीची दाखवली ‘पहिली झलक’ तर परिणितीने केली खास कमेंट





