Disha Patani – ‘दिशा पटानी’ ही बॉलिवूडमध्ये सर्वात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून नेहमीच चर्चेत असते. एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या स्पोर्ट्स बायोपिक चित्रपटामधून अभिनेत्री दिशा पटानी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे.
दिशाचा फॅशन सेन्स इतका कमाल आहे की कोणत्या वेळी काय परिधान करावे, आणि लक्ष कसे वेधून घ्यावे हे तिला बरोबर माहीत आहे. आणि म्हणूनच दिशा बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
दिशा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ फॅन्स सोबत शेअर करते. आणि फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटोला भरभरून प्रेम देतात.
नुकतंच अभिनेत्री ‘दिशा पटानी’ने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. हॉट अँड ब्युटीफुल दिशा पटानीचा बॉस लेडी लूक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये दिशा पटानी पांढऱ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, व्हाईट ब्लेझर, ब्रॅलेट आणि लाँग फिटेड स्कर्टमध्ये दिशा खूपच मादक दिसत आहे. या फोटोंमध्ये दिशा पटानी बाल्कनीत उभी असताना हे फोटोशूट करताना दिसत आहे.
या सिनेमांमध्ये दिशा पटानी दिसणार
साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार सूर्याचा पुढचा चित्रपट कांगुवा आहे. या चित्रपटात दिशा पटानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूर्या आणि दिशाला पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. कांगुवा या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती प्रभास स्टारर कल्की 2898 AD मध्ये दिसणार आहे.