Pankaja Munde| मागील चार दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून दोघांची प्रकृती खालावत आहे, तसेच त्यांनी उपचार घेण्यासही नकार दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाल धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते, अशी मागणी केली आहे.
प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) June 17, 2024
पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत लिहिले की, “प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे,” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
हेही वाचा: