कधीतरी देशाची पंतप्रधान बनण्याचीही ईच्छा

“देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला कधी तरी भारताची पंतप्रधान बनण्याची ईच्छा आहे. निक जोनासबरोबर लग्न झाल्यापासून एकाही दिवशी प्रियांकाबाबत काही चर्चा नाही, असे होत नाही. बॉलिवूड, हॉलिवूड आणि फिल्म प्रॉडक्‍शनच्या कामाबरोबर संयुक्‍त राष्ट्राची गुडविल ऍम्बेसेडर म्हणूनही तिच्यावर जबाबदारी आहे. या सर्व कामात प्रचंड व्यस्त असलेल्या प्रियांकाला आता राजकारणात शिरण्याचे वेध लागले आहे.

आपल्याला एक दिवस देशाचे पंतप्रधानपद बनायची महत्वाकांक्षा तिने बोलून दाखवली आहे. याशिवाय निक जोनासने देशाचे अध्यक्ष बनावे असेही तिला वाटते आहे. तिला जरी राजकारणात यावेसे वाटत असले तरी पतीदेव निकला मात्र राजकारणात काहीही रस नाही. दोघांनाही पक्षीय राजकारणात रस नाही. मात्र दोघांना बदल घडवायची मनापासून ईच्छा आहे.

प्रियांकाला सामाजिक जाणीव जपायची किती तळमळ आहे, हे सर्वांना माहिती आहे. महिला सशक्तीकरण, पर्यावरण. शिक्षण आणि आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करणाऱ्या उपक्रमांमध्ये ती सहभागी होत असते. प्रियांका सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्‍टमध्ये काम करते आहे. फरहान अख्तरबरोबर “स्काय इज पिंक’मध्ये ती दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे काही हॉलिवूडचे प्रोजेक्‍टही सुरू आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)