‘धूम-4’ मध्ये झळकणार शाहरुख खान?

बॉलीवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानचे गेले काही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. सतत येणा-या अपयशामुळे शाहरुख सध्या आपल्या आगामी प्रोजेक्‍ट निवडताना खूपच सावधगिरी बाळगत आहे. तरीही प्रोडक्‍शन हाउसमध्ये त्याच्याच बोलबाला आहे. चित्रपटाशिवाय तो अनेक वेब सीरीज प्रोड्यूस करत आहे.

आता शाहरुख खान धूम सीरीजमधील चौथ्या चित्रपटातून धमाकेदार कमबॅक करण्याची तयारी करत असल्याचे समजते. गेल्या अनेक वर्षांपासून धूम फ्रेंचाइजीमध्ये शाहरुखची एंट्री होणार असल्याची चर्चा होती. पण अद्याप त्याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

धूम, धूम-2 आणि धूम-3 च्या अपार यशानंतर निर्माता “धूम-4’च्या तयारीला लागले आहेत. “धूम-4’मधील स्टार कास्टबाबत अद्याप अनेकांची नाव समोर आली आहेत. तसेच या सीरीजमधील दुस-या आणि तिस-या चित्रपटाचे दिग्दशर्न विजय आचार्य यांनी केले असून चौथ्या सिरीजमधून त्यांना हटविण्यात आले आहे.

दरम्यान, यशराज फिल्म्सने “धूम-4’साठी खलनायकाच्या भूमिकेसाठी शाहरुखला अप्रोच केले आहे. या भूमिकेसाठी शाहरुखने होकार दर्शविल्यास उदय चोप्रा आणि अभिषेक बच्चन नव्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पडद्यावर झळकतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.