World Cup 2023 New Zealand vs South Africa Match : पुण्याच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकची बॅट चांगलीच गरजली. डी कॉकने (Quinton de Kock) शानदार फलंदाजी करत विश्वचषक 2023 मध्ये चौथे शतक झळकावले. रॅसी व्हॅन डर डुसेनसह यष्टीरक्षक फलंदाज डी कॉकने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या विश्वचषकात डी कॉकनेही 500 धावा पूर्ण केल्या असून अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
क्विंटन डी कॉक आपला शेवटचा एकदिवसीय विश्वचषक पूर्णपणे संस्मरणीय बनवत आहे. विश्वचषक 2023 च्या सातव्या सामन्यात त्याने चौथे शतक झळकावले. यावेळी डी कॉकने न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात शतक झळकावले. त्याने 103 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यापूर्वी त्याने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी खेळली होती.
What a way to reach his 4️⃣th #CWC23 ton 💯
This Quinton de Kock six is one of the moments that could be featured in your @0xFanCraze Crictos Collectible packs!
Visit https://t.co/8TpUHbQikC to own iconic moments from the #CWC23 pic.twitter.com/V0IEHj8Z1K
— ICC (@ICC) November 1, 2023
संगकाराशी साधली बरोबरी…
न्यूझीलंडविरुद्धच्या शतकानंतर डी कॉक रोहित शर्माच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर आहे. न्यूझीलंडविरुद्ध डी कॉकने 116 चेंडूंत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 114 धावांची खेळी केली. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक 5 शतके झळकावण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने 2019 च्या आवृत्तीत 5 शतके झळकावली होती. डी कॉकने चार शतके पूर्ण केली आहेत. अशा स्थितीत आणखी एक शतक झळकावून तो रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी करेल. एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत 4 किंवा त्याहून अधिक शतके करणारा डी कॉक जगातील तिसरा फलंदाज ठरला. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 2015 च्या स्पर्धेत 4 शतके झळकावली होती.
डी कॉकने इतिहास रचला…
क्विंटन डी कॉकने आता वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या 7 सामन्यात 545 धावा केल्या आहेत. 50 षटकांच्या विश्वचषकात 500 किंवा त्याहून अधिक धावा करणारा डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज ठरला आहे. डी कॉकच्या आधी हा विक्रम जॅक कॅलिसच्या नावावर होता, ज्यांनी 2007 च्या विश्वचषकाच्या एका मोसमात दक्षिण आफ्रिकेसाठी 485 धावा केल्या होत्या. तर, एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये 482 धावा केल्या होत्या. डी कॉकने दोन्ही दिग्गज खेळाडूंना एकत्र मागे टाकले आहे.
#CWC23 #SAvNZ : डिकॉक-ड्युसेनची झंझावाती शतके; आफ्रिकेचा न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर…
हर्षल गिब्सशी साधली बरोबरी…
क्विंटन डी कॉकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या हर्षल गिब्सची बरोबरी केली आहे. डी कॉकचे वनडे क्रिकेटमधील हे 21 वे शतक होते. गिब्सच्या नावावर 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये केवळ 21 शतके आहेत. डी कॉक आता फक्त एबी डिव्हिलियर्स आणि हाशिम आमला यांच्या मागे आहे. आमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक 27 तर डिव्हिलियर्स याने 25 शतके झळकावली आहेत.