सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील युवक करोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. ही व्यक्ती 45 वर्षीय असून ते भोर याठिकाणी कामाला आहेत.
भोरमध्ये तो करोना रुग्णाच्या संपर्कात आल्यावर त्यांची भोर याठिकाणी तपासणी केली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती भोर आरोग्य विभागाने बारामती आरोग्य विभागाला दिली आहे.
खंडोबाचीवाडीसह नीरा-निंबुत, सोमेश्वरनगर परिसरात भीतीचे वातावरण आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे.