मंचर – आंबेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात शेतीकाम करताना महिला सोशल डिस्टन्स ठेवून कांदा पिशव्यांमध्ये भरुन बाजारपेठेत पाठवत आहे. सध्या दहा किलो कांद्याला 180 ते 200 रुपये बाजारभाव मिळत आहे. कांदा चाळ नाही, असे शेतकरी शेतातच व्यापाऱ्यांना कांदा विकत आहेत.
अवसरी, टाव्हरेवाडी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगाव, लाखणगाव, देवगाव परिसरात कांदा लागवड केली जाते. कांदा काढणीला सुरुवात झाली आहे. करोनामुळे महिला मजूर मिळत नसल्याने शेतकरी घरच्या घरी कांदा काढत आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे महिलांनी छत्रीचा आधार घेतला आहे.