नवी दिल्ली -अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदाच “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलीय भट्ट यांच्यासह मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जून हे देखील झळकणार आहेत.
ब्रह्मास्त्र चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यासाठी 15 डिसेंबर रोजी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रणबीर-आलिया उपस्थिती लावणार असल्याचे समजते. याचबरोबर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील घोषित करण्यात येईल, असेही म्हटले जात आहे.
या चित्रपटाची करण जोहरने निर्मिती केली असून, अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी रिलीज होऊ शकतो. ब्रह्मास्त्र हा पौराणिक कथानकावर आधारित चित्रपट आहे.
दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, आलियानेही अनेकदा रणबीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्याचबरोबर आलिया आता नेहमीच रणबीरच्या फॅमिली फंक्शन्समध्ये दिसली आहे.