…म्हणून अधिकाऱ्यांनी ट्रम्प कुटुंबियांना चर्चेतून बाहेर काढण्याचा दिला इशारा

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे संकट वाढले होते त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. परंतु, ज्यावेळी ट्रम्प स्वतः कोरोनाबाधित झाले त्यावेळी त्यांनी सर्व नियम पाळण्यास सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटूंबियांनी कोरोनासाठीचे असणारे नियम आजपर्यंत एवढ्या काटेकोरपणे कधीच पाळाले नाहीत. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा सर्वांसमोर आली. मात्र यावेळी त्यांच्या या दुर्लक्षपणाला तिथल्या अधिकाऱ्यांनीच चाप बसवला असल्याचे दिसले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच कोरोनाला हलक्यात घेतले होते. यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. नंतर ते स्वत: कोरोना संक्रमित झाले, असे असूनही, त्यांच्या कुटुंबियांनी मास्क लावण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या शेवटच्या अध्यक्षीय चर्चेच्या वेळी, त्यांचे संपूर्ण कुटुंब मास्क घातलेले दिसले. अधिकाऱ्यांनी आधीच सूचना दिल्या होत्या की, जर त्यांनी मास्क घातला नाही, किंवा मास्क काढला तर त्यांना चर्चेच्या ठिकाणाहून बाहेर केलं जाईल.

शेवटच्या अध्यक्षीय चर्चेच्या वेळी अधिकाऱ्यांच्या दबावामुळे हे कुटुंब संपूर्ण वेळ मास्क घालून बसले होते. फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, मुलगी इवांका आणि टिफिनी, मुलगा एरिक देखील मास्क लावून या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या कपड्याच्या हिशोबाने यांनी मास्क घातले होते.

अध्यक्षपदाच्या चर्चेच्या पहिल्या फेरीनंतरच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनाही रुग्णालयात बराच वेळ घालवावा लागला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.