Heena Khan| छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. मात्र सध्या तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. हिना खान एका आजाराशी झुंज देत आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करत तिने खुलासा केला. यामुळे चाहत्यांनी तिच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हिना खान पोस्ट Heena Khan|
हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोबत तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात खजूर असल्याचे दिसते. याला कॅप्शन तिने लिहिले की, “मला गंभीर गॅस्ट्रोसोफेजल रिफ्लक्स (Gastroesophageal reflux disease- GERD) आजार झाला आहे. रमजानमध्ये जर मी उपवास करत राहिले तर माझी तब्येत अजून खराब होते.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले, “या आजाराशी लढा देण्यासाठी अजवा खजूर मदत करू शकेल, असे आईने सांगितले आहे. तुम्ही काही घरगुती उपाय सुचवू शकाल का? कृपया येथे कमेंट करून सुचवा. मेसेज करू नका कारण खूप मेसेज असल्याने तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही,” असे म्हणत तिने या आजाराला लढा देण्यासाठी चाहत्यांकडून सल्ला मागितला आहे. Heena Khan|
हिनाच्या या पोस्टवर काळजी व्यक्त करत तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तिला घरगुती उपायही सुचवले आहेत. तर काहींनी तिला ‘लवकर बरी हो’ असे म्हंटले आहे. हिना खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ अशा मालिकांबरोबरच हिना ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोजमध्ये दिसली होती.
याशिवाय तिने चित्रपटांमध्ये आणि वेब सिरिजमध्येही काम केले आहे. अलीकडेच हिना खान अमेरिकेत प्रदर्शित झालेल्या कंट्री ऑफ ब्लाइंड या चित्रपटात दिसली होती. यातील तिच्या कामाचे कौतुक देखील करण्यात आले.
हेही वाचा: