मुंबई – मराठमोठी अभिनेत्री संस्कृती बालगुडेने 2011 मध्ये “पिंजरा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर ती अनेक चित्रपटांसह सिरीजमध्ये देखील झळकली. संस्कृती बालगुडेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकतंच अभिनेत्रीने एका मुलाखतीतील आपल्याला आईने झाडूने बेदम मारल्याचा किस्सा सांगितला आहे.
संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या कामाबाबतच्या सर्व अपडेट ती चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. संस्कृतीचे अनेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत असतात. आता देखील संस्कृतीने सांगितलेल्या अशाच एका किस्स्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत संस्कृती बालगुडेने आपल्या खाजगी आयुष्याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी संस्कृतीला तू पहिली शिवी केव्हा दिलीस असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना ती म्हणाली,एकदा मी रागात असताना आईसमोर चुकून शिवी दिली होती. अर्थात ती आईसाठी नव्हती तेवढी हिम्मतही माझ्यात नव्हती. परंतु मी तो शब्द बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं कि आई बाजूला आहे.
संस्कृती म्हणते त्यानंतर आईने माझ्याकडे पाहत एक पॉझ घेतला आणि मला विचारले काय म्हणालीस तू? परत बोल असं म्ह्णून आईने बाजूला असलेला झाडू घेतला आणि मला बेदम मारलं. आई मला झाडून मारत होती आणि मी खोलीत इकडे तिकडे पळत होते. संस्कृतीने आपल्या शालेय जीवनातील किस्सा सांगून सर्वांनाच थक्क केलं.