मुंबई – टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 4’ची विजेती श्वेता तिवारी अजूनही तिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करते. श्वेता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्स करते आणि आपल्या बोल्ड लूक मुळे चाहत्यांना वेड लावते. वयाची 40 ओलांडल्यानंतरही श्वेताचा फिटनेस पाहून अनेकजण चकित होतात. श्वेताने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहतेही फिदा झाले आहेत.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये श्वेताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिची तुलना मुलगी पलक तिवारीशी करत आहेत. ‘श्वेताने मुलीलाही मागे टाकले’, ‘तुझ्यासमोर पलकसुद्धा फिकी पडेल’, अशी कमेन्ट नेटकऱ्यांनी केली आहे. सध्या तिचे हे फोटो अनेकांच्या पसंतीस पडले आहेत.
Instagram पर यह पोस्ट देखें
दरम्यान, श्वेता तिवारीने ‘मधहोशी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनेकदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पलक तिवारी श्वेता तिवारीचा पाहिला पती राजा चौधरी याची पलक तिवारी मुलगी आहे. तिचे दुसरे लग्न अभिनव कोहलीसोबत झाले होते. तिला एक मुलगाही आहे, त्याचे नाव रेयांश आहे.