कराची – मंगळवारी रात्रीपासून पाकिस्तानचे पोलीस आणि इम्रान खान यांच्या समर्थकांमध्ये जोरदार युद्ध सुरू झाले. लाहोरमधील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराबाहेर बुधवारी सकाळी ६ वाजता पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराचा मारा आणि जोरदार गोळीबार सुरू केला.
Imran Khan’s party workers started coming out to support him. #ImranKhan #ZamanPark #Lahore https://t.co/RyyTvCJpnB pic.twitter.com/06c2wP4vTC
— 5star (@Ak_bh2047) March 14, 2023
यानंतर पोलिसांच्या पथकाने घराला वेढा घातला. इस्लामाबाद पोलिसांना तोशाखाना प्रकरणात अटक करायची होती, त्यासाठी कालपासून सतत प्रयत्न सुरू आहेत. वृत्तसंस्थेनुसार, सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, ‘चकमकीत दोन्ही बाजूचे अनेक लोक जखमी झाले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार इम्रान खानला अटक करण्यासाठी इस्लामाबादहून पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले होते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)च्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी लाहोरमधील जमान पार्कचा ताबा घेतला होता. दुसरीकडे, आज सकाळी पोलिसांनी पुन्हा एकदा लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करून समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांची अटक टाळण्यासाठी पोलिसांशी झटापट केली. खानला अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही पोलीस त्याला अटक करू शकले नाहीत. खान यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला.