मुंबई – अभिनेत्री क्रिती सॅननने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. नुकतेच तिने ‘आदिपुरुष’ या चित्रपटात ‘जानकी’च्या भूमिकेत दिसली होती. मात्र या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र आता क्रितीने अभिनयासह आता आणखी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
क्रिती आता एक निर्माती म्हणून करिअरची सुरुवात करणार आहे. सोशल मीडियाद्वारे तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. एक क्रितीने तिच्या प्रोडक्शन हाऊसचा टीझर शेअर केला आहे. ‘ब्लू बटरफ्लाय फिल्म्स’ असे तिच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव आहे. यानंतर तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. अनेक सेलिब्रिटींंनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, आपल्या प्रोडक्शन हाऊसचे नाव ‘ब्लू बटरफ्लाय’ का? ठेवले याबद्दल स्वतः अभिनेत्रीने खुलासा केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणते की, “याची दोन कारणे आहेत… पहिले म्हणजे मला फुलपाखरू खूप आवडते आणि दुसरे म्हणजे निळा हा माझा आवडता रंग आहे. यासोबतच क्रितीने व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये निळ्या रंगाचे पोशाख परिधान केलेल्या अनेक फोटोंचे मॉन्टेज बनवले आहे.
‘ब्लू बटरफ्लाय’ चिन्ह तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये बर्याच काळापासून आहे आणि ती अनेकदा फोटोंच्या कॅप्शनमध्ये देखील वापरते. याशिवाय क्रिती जेव्हाही कविता लिहिते तेव्हा त्यासोबत ती ब्लू बटरफ्लाय वापरते. माझ्या समजुतीनुसार निळ्या फुलपाखराचा अर्थ आहे, स्वप्ने, उड्डाण, उंची, स्वातंत्र्य, समानता, सकारात्मकता, आनंद आणि प्रत्येक प्रकारच्या सकारात्मक भावना.
मला वाटते की माझे जीवन आणि माझे आतापर्यंतचे अनुभव फुलपाखरासारखे अप्रतिम होते. मी अगदी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात केली आणि खूप काही शिकले आणि आज मी जिथे आहे तिथे हळूहळू प्रगती केली. मी आज जे आहे ते बनण्यासाठी मी दररोज कठोर परिश्रम घेत आहे.’ असं कृती म्हणते.