मुंबई – आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाचा मुहूर्त आज मुंबईत पार पडला आहे. धमाल कॉमेडी असलेला हा चित्रपट १३ मार्च २०२० ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटात आयुषमान गे तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रत्यक्षात जरी आयुषमान गे नसला तरी त्याने कधी काळी एका पुरुषाला किस केले होते. एका प्रसिद्ध संकेतस्थळाला मुलाखत देताना त्याने हा किस्सा शेअर केला आहे.
मी जेव्हा रोडीज मध्ये होतो तेव्हा एके दिवशी आम्ही ट्रुथ अँड डेअर खेळत होतो. त्यावेळी मला डेअर म्हणून एका मुलाला किस करायला सांगितले होते. त्यावेळी मी त्याला लिप किस केलं होतं’, असे आयुषमानने सांगितले.
आयुषमानच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटात त्याच्यासोबत जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, गजराज राव, सुनीता रजवार , भुमी पेडणेकर यांच्यादेखील भूमिका आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारी 2020 ला रिलीज होणार आहे.
यावेळी चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार, आनंद एल राय आणि आयुष्यमान खुराणा यांनी क्लॅप देऊन शूटींगला सुरूवात केली. ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाला मिळालेल्या तुफान यशानंतर हा त्याचा दुसरा भाग आहे. आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची जोडी पुन्हा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.