पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून 21.28 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदा जोरदार स्वरुपाचा पाऊस झाल्याने सर्वच धरणे 100 टक्के भरली. त्याचबरोबर परतीच्या पावसाने सुध्दा दमदार हजेरी लावल्याने धरणात मुबलक पाणीसाठा जमा झाला. यामुळे यंदा धरणात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. खडकवासला धरणातून यापूर्वी शेतीसाठी एक आर्वतन सोडण्यात आले होते. आता पुन्हा खडकवासला धरणातून 1205 क्युसेक ने पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. दुरुस्तीसाठी यंदा टेमघर धरण लवकर रिकामे करण्यात आले.
त्यामुळे टेमघरमध्ये 0 टक्के पाणीसाठा आहे. वरसगाव धरणात 10.35 टीएमसी म्हणजे 80 टक्के पाणीसाठा, पानशेतमध्ये 9.40 टीएमसी म्हणजे 88 टक्के पाणीसाठा आणि खडकवासला धरणात 1.45 टीएमसी म्हणजे 73 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.