नवी दिल्ली – संयुक्तराष्ट्रांनी 2023 हे वर्ष बाजरी पिकासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आयटीसी शेरेटन हॉटेलने जी 20 परिषदेसाठी आलेल्या जागतिक नेत्यांना बाजरीपासून बनवलेले 20 पदार्ध आवर्जून तेथील खाद्य यादीत समाविष्ट केले होते. त्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्ती आणि अन्य उपस्थितांनी आर्वजून कौतुक केले.
लहान शेतकऱ्यांसाठी बाजरी हे सर्वात सुरक्षित पिक आहे कारण ती उष्ण आणि दुष्काळी वातावरणाला अनुकूल आहे. भारत सामान्यतः सर्व नऊ जातीच्या पारंपारिक बाजरीचे उत्पादन करतो त्यात ज्वारी, मोती बाजरी, फिंगर बाजरी, फॉक्सटेल बाजरी, प्रोसो बाजरी, लिटल बाजरी, बार्नयार्ड बाजरी, ब्राउनटॉप बाजरी आणि कोडो बाजरी या जातीचा समावेश आहे. हॉटेलच्या लॉबीमध्ये पारंपारिक भारतीय फुलांसह टेराकोटा मातीच्या भांड्यांवर हाताने रंगवलेल्या ‘अल्पोना’ डिझाईन्स सह या खाद्यपदार्थांची तेथे मांडणी करण्यात आली होती.शनिवारी, राष्ट्रपती मुर्मू यांनी भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या मेजवानीला सुमारे 170 पाहुण्यांनी हजेरी लावली. अधिकृत डिनरच्या मेनूमध्ये अनेक बाजरीवर आधारित पदार्थ होते.
तसेच, शनिवारी जी 20 सदस्य देशांच्या पहिल्या महिला आणि पती-पत्नींनी भारतीय कृषी संशोधन संस्थेने तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनात भारताच्या कृषी उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या कार्यक्रमात प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर, अनाहिता धोंडी आणि अजय चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली बाजरी-केंद्रित लाइव्ह कुकिंग सेशन, तसेच प्रख्यात भारतीय स्टार्टअप्सच्या अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, त्यांच्याशी संवाद यासारखे अनेक आकर्षक उपक्रम होते. तेथे वैशिष्ट्यपुर्ण रांगोळीही साकारण्यात आली होती. त्यात बाजरीच्या दोन रांगोळ्या हे विशेष आकर्षण होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेकडे प्रयत्न केले आणि भारताच्या या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिला. भारतातील बहुतेक राज्यांमध्ये एक किंवा अधिक बाजरी पिकांच्या प्रजाती उत्पादित केल्या जातात. राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही प्रमुख बाजरी उत्पादक राज्ये आहेत.