नवी दिल्ली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिनाभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत टाकण्याचा निर्णय घेतला होता. हे आंदोलक कुस्तीपटू पदकांसह हरिद्वारला पोहोचले होते. ज्यांना भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी समजावून सांगून परत केले आहे.
टिकैत यांनी पैलवानांना त्यांचा निर्णय पाच दिवस पुढे ढकलण्यास सांगितले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विचारले की बबिता फोगट आपल्या कुटुंबातील आंदोलक कुस्तीपटूंना पाठिंबा का देत नाही ?
एका मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘बबिता फोगट यांच्याशी माझे बोलणे झाले. बबिता फोगट सारखी जगप्रसिद्ध कुस्तीपटू अशा लोकांची बाजू घेईल ज्यांनी इतरांचे आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे शोषण केले असे तुम्हाला वाटते का? कुस्तीपटूंनी संध्याकाळी 6 वाजता पदकांचे विसर्जन करू असे सांगितले आणि रात्री 8 वाजेपर्यंत तसे का केले नाही हा मुद्दा नाही. ज्यांना कायद्याची माहिती आहे त्यांना माहित आहे की कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. आता ढवळाढवळ केली तर ती त्या महिलांच्या विरोधात जाईल, असे त्या म्हणाल्या आहे. इराणी पुढे म्हणाल्या की, मला हे जाणून घ्यायचे आहे की विरोधी पक्षाचे नेते या कुस्तीपटूंना निष्पक्ष तपासापासून का वंचित ठेवू इच्छितात. बबिता फोगट आपल्या कुटुंबियांच्या विरोधात अशा प्रकारे उभी राहील असे तुम्हाला वाटते का?
जंतरमंतरवर सुरू झालेल्या कुस्तीपटूंच्या निषेधाच्या दुसऱ्या टप्प्यात भाजप खासदार आणि माजी कुस्तीपटू बबिता फोगट दूरच दिसल्या. या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यात बबिता यांनी सरकार आणि आंदोलकांमध्ये मध्यस्थी म्हणून काम केले. बबिता यांनी प्रियांका गांधी वड्रा यांच्या निषेधाच्या ठिकाणी उपस्थित राहण्यास विरोध केला. त्यांनी सांगितले की, प्रियांका गांधी यांचे स्वीय सचिव संदीप सिंग यांच्यावरच दलित महिलेचा अपमान केल्याचा आरोप आहे.