नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसद भवनाचे नुकतेच उद्घाटन केले. या उदघाटनावरून देशात विरोधकांनी खूप गोंधळ घातला. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करण्याची मागणी करत अनेक विरोधी पक्षांनी हा सोहळ्यावर बहिष्कारदेखील टाकला होता. नवीन संसद भवनाच्या इमारतीच्या रचनेबाबतही आरजेडीने वादग्रस्त ट्विट केले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी एक ट्विट करत भवनाच्या रचनेवरून सरकारला धारेवर धरले आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नवीन संसद भवना बाबत सांगितले की, संसद भवनाची रचना आफ्रिकन देश सोमालियाच्या जुन्या संसदेतून कॉपी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी ट्विट करत, गुजरातमधील मोदींच्या ‘पेट’ आर्किटेक्टने सोमालियाच्या जुन्या संसदेची कॉपी करण्यासाठी 230 कोटी रुपये आकारले आहेत. सोमालियाने आपली जुनी संसद नाकारली आहे, ही नवीन भारताची प्रेरणा आहे!
Full marks to you @jawharsircar. Can you believe it!! Somalia’s rejected Parliament building is our @narendramodi ji’s inspiration!! @PMOIndia please recover ₹230 crores from your copy cat Architect. @BJP4India @INCIndia https://t.co/VlaqKqEmvB
— digvijaya singh (@digvijaya_28) May 31, 2023
गुजरातमधील मोदींचा पाळीव वास्तुविशारद -जो नेहमी “स्पर्धात्मक बोली” च्या माध्यमातून मोदींचे मेगा कॉन्ट्रॅक्ट मिळवतो, त्याने आम्हाला ₹230 कोटी चार्ज केलेल्या सोमालियाच्या डिझाइनची कॉपी करण्यास सांगितले.” जवाहर सरकारच्या ट्विटला रिट्विट करताना काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींना टॅग केले आहे.
मोदींना टॅग करत सिंग यांनी ‘सोमालियाने नाकारलेली संसद भवन आमच्या पंतप्रधानांची प्रेरणा आहे यावर विश्वास ठेवू शकता का? दिग्विजय यांनी जवाहर सरकारला पूर्ण आकडे लिहिले. सोमालियाने नाकारलेली संसदेची इमारत ही आमच्या पंतप्रधान मोदींची प्रेरणा आहे यावर तुमचा विश्वास आहे का.” पीएमओला टॅग करत काँग्रेस नेत्याने कॉपीकॅट आर्किटेक्टकडून 230 कोटी रुपये वसूल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या या टीकेला सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.