मुंबई – गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट प्रदर्शित झाले. काश्मीर फाईल्स सारख्या चित्रपटाने काश्मीरमध्ये पंडितांवर झालेला अन्याय सर्वांसमोर आणला. तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेल्या द केरला स्टोरी या चित्रपटाने केरळमधील हिंदू मुली लव जिहादमध्ये कशी अडकतात हे दाखवले. हे चित्रपट जेवढे सुपरहिट ठरले तेवढाच याचा वाद देखील झाला.अशात आता नव्या एका चित्रपटाचा टीजर समोर आला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरु झालीय आहे कारण हा चित्रपट गुजरातमधील गोध्रा हत्यांकांडावर आधारित आहे.
गुजरातच्या गोध्रा हत्याकांडावर बनलेल्या ‘एक्सिडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. गोध्रा हत्याकांड प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नानावटी-मेहता आयोगाच्या तपास अहवालातील तथ्यांवर हा चित्रपट आधारित असल्याचे समजते.
या टीजरमध्ये केवळ आकडेवारी पाहायला मिळत आहे. सत्य घटनांवर आधारित असा उल्लेख यावेळी करण्यात आला आहे. टीजरमध्ये कोणताही कलाकार किंवा डायलॉग दाखवण्यात आलेला नाही. मात्र साबरमती एक्सप्रेसचा उल्लेख यामध्ये केल्याचे पाहायला मिळते.
‘अपघात की षडयंत्र’ असं देखील या टीजरमध्ये विचारण्यात आलं आहे. ट्रेनमधील हत्याकांड,दंगल यावरच आडहरित हा सिनेमा असणार आहे हे या टीजरवरून स्पष्टपणे समजते. सोशल मीडियावर आता हा टीजर चर्चेचा विषय ठरत आहे.