नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी सांगितले की, ‘अमेठीमध्ये राहुल गांधींच्या विरोधात मी महिला आहे म्हणून नाही, तर पक्षाला वाटत होते की केवळ मीच त्यांचा पराभव करू शकते. तसेच महिला रिअल एस्टेट डेव्हलपर्सना त्वरीत मंजुरी देण्याचा विचार करावा असंही म्हटलं आहे. रिअल इस्टेट डेव्हलपर्स बॉडी क्रेडाईने आयोजित केलेल्या परिषदेत त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका मांडली आहे.
सरकारने महिला रिअल इस्टेट डेव्हलपर्सना लवकर मंजुरी देण्याचा विचार करावा, असे म्हटल्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या,’ त्याऐवजी पुरुष विकासकांशी स्पर्धा करू. मला अमेठीला पाठवण्यात आले कारण त्या माणसाला (राहुल गांधी) पराभूत करणारी मी एकमेव व्यक्ती भाजपमध्ये होती.’
राहुल गांधी यांचा 55 हजार मतांच्या फरकाने पराभव
इराणी यांनी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरू-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधींचा सुमारे 55,000 मतांच्या फरकाने पराभव केला होता. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींकडून एक लाख मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता.