वॉशिंग्टन – अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाच्या सहकार्याने काही भारतीय शास्त्रज्ञ अंतराळ संशोधन करत असून या टीमला नुकताच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर एक छोटा जीव आढळला आहे. हा छोटा जीव दुसरे तिसरे काही नसून एक एक जिवाणू आहे. या जीवाणूचे चार प्रकार संशोधकांना या स्पेस स्टेशनवर आढळले असून ही महत्त्वाची उपलब्धी मानण्यात येत आहे.
पृथ्वीपासून पासून हजारो किलोमीटर दूर एकाकी एकाकी ठिकाणी हा जिवाणू आढळल्याने शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. शास्त्रज्ञांच्या टीमला ज्या चार प्रकारचे जीवाणू आढळले आहेत ते सर्वसाधारणपणे माती आणि गोड पाणी यांच्याशी संबंधित आहेत. हे जिवाणू आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचले कसे याबाबत मात्र शास्त्रज्ञ कोड्यात पडले आहेत.
या स्टेशनवर राहणारे वैज्ञानिक अतिशय कमी प्रमाणात आणि ठरावीक प्रकारचे भोजन घेत असतात त्यांच्या माध्यमातून हा जिवाणू तेथे पोहोचला असे मानता येत नाही हे जिवाणू तेथे पोहोचले कसे आणि जिवंत राहिले कसे याबाबत आता शास्त्रज्ञ शोध घेत आहेत.
सर्वसाधारणपणे जर मातीमध्ये एखादे रोप लावण्यात आले तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे जीवाणू आढळतात. त्यामुळे अशा प्रकारचे मातीत वाढणारे किंवा रोप वाढण्यासाठी मदत करणारे जिवाणू आंतराष्ट्रीय स्पेस स्टेशन दिसल्याने शास्त्रज्ञांना संशोधनासाठी आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे