अमेरिकेतील निवडणुकीचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालाबाबत अनेक निकष लावले जात आहेत. मात्र अमेरिकेेतील एका लहान शहराने आपला मेयर म्हणजेच महापौर निश्चित केला आहे. माणूस सोडून कोणता प्राणी कधी महापौर होऊ शकतो का? असं विचारलं तर अनेकांंची उत्तरं नाही असतील. मात्र अमेरिकेतील एका शहरात चक्क कुत्र्याला महापौर पदी निवडून दिले आहे.
रॅबिट हॅश हे अमेरिकेतील लहान शहर आहे. या शहरातील लहान समुदायाने प्रांसीसी बुलडॉगला आपला नेता म्हणून जाहीर केलं आहे. विल्बर बीस्ट असं या कु्त्र्याचं नाव आहे. रैबिट हैश हिस्टोरिकल सोसाइटीच्या अहवालानुसार या कु्त्र्याने 13, 143 मतं मिळवले आहेत.
Posted by Lady Stone on Tuesday, November 3, 2020
रैबिट हैश हिस्टोरिकल सोसायटी, जे या शहराचे मालक आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट केली की शहरातील महापौराची निवडणुक संपन्न झाली. विल्बर बीस्ट नवीन महापौर झाले आहे. त्या कुत्र्याला . 22,985 मतांमध्ये 13,143 मतं मिळाले आहे.
दरम्यान, केंटुकी डॉट कॉमनुसार, रैबिट हैश, ओहीयो नदीच्या किनारी एक समुदाय आहे. जो 1990 पासून कु्त्र्यांना आपला महापौर म्हणून निवडून देत आहे. कुत्रा सुरक्षितता कायम ठेवतो म्हणून त्याला महापौर करत आहे असं काही तज्ञांंचं म्हणणं आहे.