स्थानिक महापालिकेचा ताबा घेण्याचा प्रयत्न
झेवकान, (कोसोवो) – कोसोवाच्या उत्तरेकडील सर्ब वंशियांच्या गटाने आज महापालिकेची इमारत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या महापालिकेमध्ये गेल्या आठवड्यात अल्बानिया वंशाच्या महापौराने स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने महापालिकेत प्रवेश केला आहे. तेंव्हापासून सर्ब वंशिय आणि अल्बानिया वंशियांमध्ये तणाव सुरू आहे. सर्बियाने आपल्या सैन्याला सतर्कतेचा इशारा दिला असून सैन्याच्या तुकड्या कोसोवोच्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत.
कोसोवोने 2008 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे जाहीर केले. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे. सर्बियाने कोसोवोला मान्यता दिलेली नाही. दोन्ही देशांमधील वाद मिटवण्यासाठी अमेरिका आणि युरोपीय संघाकडून प्रयत्न केले जात आहेत.
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध सुरू असताना हा वाद चिघळल्यास युरोपातील परिस्थिती अधिक बिघडण्याची भीती आहे. युरोपीय संघामध्ये दोन्ही देशांना सामील व्हायचे असेल, तर त्यांनी आपापसातील वाद मिटवले पाहिजेत, असे युरोपीय संघाने म्हटले आहे. सर्बियाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे सर्ब वंशियांवर नियंत्रण अवघड झाले आहे.