‘स्लीपर कोच’ शिवशाही बस गुंडाळणार

12 मार्गांवरील सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय

पुणे – शिवशाही बसेसची “स्लीपर कोच’ सेवाही आता आर्थिक अडचणीत सापडली आहे. या बसेसच्या प्रवासाचे दर कमी करुनही प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. त्यानुसार 12 मार्गांवरील ही सेवा तत्काळ बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या बसेसचे आगाऊ आरक्षण लक्षात घेता ही सेवा येत्या 15 तारखेपासून बंद करण्यात येणार आहे.

खाजगी बसेसच्या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी आणि प्रवाशांना या बसेसच्या दर्जाची सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने शिवशाही बसेसच्या माध्यमातून राज्यभरातील तब्बल 88 मार्गावर “स्लीपर कोच’ सेवा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी ही सेवा सुरू करण्यात आली होती, खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी या बसेसचे दरही कमी ठेवण्यात आले होते. मात्र, तरीही या बससेवेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे 15 फेब्रुवारीपासून या बसेसचे दर आणखी कमी करण्यात आले. पण, गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत या बससेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या बसेस मोकळ्याच पाठविण्याची वेळ महामंडळावर आली. त्यामुळे नाईलाजाने 12 मार्गांवरील सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे विभागीय नियत्रंक आणि शिवशाही बसेसचे राज्य समन्वयक श्रीनिवास जोशी यांनी “प्रभात’ला दिली.

हे मार्ग होणार बंद
1) मुंबई- औरंगाबाद
2) मुंबई- बीड
3) मुंबई- परळी
4) मुंबई- लातूर
5) मुंबई- उस्मानाबाद
6) मुंबई- शिरपूर
7) पुणे- धुळे
8) पुणे- नंदूरबार
9) पुणे-चोपडा
10) पुणे- अमरावती
11) पुणे- यवतमाळ
12) नाशिक- सोलापूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.