वाघळवाडी (वार्ताहर) –मागील काही महिन्यांपासून बारामती तालुक्यातील वाघळवाडी व करंजे वनविभाग हद्दीमध्ये सर्रास अवैधरित्या वृक्षांची तोडणी केली जात आहे. शासनाकडून पावसाळ्यामध्ये वृक्षसंवर्धन व लागवडीसाठी प्रोत्साहन देत अनेक कार्यक्रम हाती घेतले जातात. त्या वनविभाग हद्दीमध्ये अनेक ठिकाणी वृक्ष लागवड केली जात असते. पण या लागवड केलेल्या वृक्षांची जितकी काळजी घ्यायची गरजेचे आहे तितकी घेत नसल्याचे चित्र वाघळवाडी विभाग हद्दीमध्ये दिसत आहे.
येथील वनविभाग हद्दी परिसरामध्ये झाडांची ज्वलनाच्या लाकडांसाठी इतर कामांसाठी वृक्षांची अवैध रीतीने तोडणी केली जात असल्याचे दिसत आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. पण दोन्ही विभागाचे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याचे पर्यावरण प्रेमींकडून खंत व्यक्त केली जात आहे.
खुर्ची सोडवेना…
वाघळवाडीत शेकडो एकर पसरलेला वनविभाग परिसर आहे. अधिकारी या परिसरात चक्कर मारत नाहीत व कर्मचारी तर आठवड्यातून दोन वेळा धावती चक्कर मारतात तेही दुचाकीवरून. या सर्व प्रकारामुळे अवैध काम करणाऱ्यांवर वचक राहिलेला नाही.