मुंबई – स्कोडा या कार उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीने आपल्या विविध उत्पादनांच्या दरात तीन टक्क्यांची दरवाढ जाहीर केली आहे. पोलाद, ऍल्युमिनीयम व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
ही दरवाढ जानेवारी महिन्यापासून लागू होणार असल्याचे समजले जाते. या अगोदरच मारुती, टोयोटा किर्लोस्कर मोटर या कंपन्यांनी याच कारणामुळे दरवाढ जाहीर केली आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे कार उत्पादन थंडावले असतांनाच कार कंपन्या दरवाढ जाहीर करीत आहेत. त्याचा विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.