नवी दिल्ली : देशात केरळ आणि शेजारच्या राज्यांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इसिसच्या सहा दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
दोषी ठरविण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे मनसीद मेहमूद, स्वालीह मोहम्मद, रशीद अली, रमशाद, सफवान आणि मोइनुद्दीन अशी आहेत. विशेष न्यायाधीश पी. कृष्णकुमार यांनी जस्मीन एन. के. याला निर्दोष ठरविले.
बेकायदेशीर कारवाया प्रतिंबधक कायद्यान्वये या आरोपींना दोषी ठरविण्यात आले असून त्यामध्ये दहशतवादी संघटनेचे सदस्यत्व आणि दहशतवादी संघटनेला सहकार्य करण्याच्या आरोपांचाही समावेश आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये कन्नूर जिल्ह्यातील कनकमला येथे एनआयएने आयसिसचा गट उद्वस्त केला. न्यायाधीश, पोलीस अधिकारी, राजकीय नेते, परदेशी पर्यटक आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ले करण्याची योजना आखत असताना हा गट उद्वस्त करण्यात आला होता.