सातारा -येथील जिल्हा रुग्णालयात 15 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या 5 अशा एकूण 20 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात सोमवारी दि.13 एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गामुळे 5 नागरिकांना तर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात 1 नागरिकास कोविड-19 संशयित रुग्ण म्हणून एकूण 6 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 6 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.